ठाणे : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे व मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाणे ,येथे दिनांक ७ व ८ मार्च २०२० रोजी ठाणे ग्रंथोत्सव २०१९ च्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. | शनिवार दि.७ मार्च २०२० रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी आयोजन करण्यात आले आहे व दुपारी ३ वाजता या कार्यक्रमांचे उद्घाटन नगर विकास मंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आहे.या कार्यक्रमास गृहनिमार्ण मंत्री जितेंद्र आव्हाड प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे.४ वाजता परिसंवाद,सायकाळी ५ वाजता गाते गझल मराठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ___ रविवार दि ८ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता.जात्यावरच्या कविता, दुपारी २ वाजता काव्यसंमेलन व ४ वाजता ठाणे ,पालघर जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालाचा सत्कार व समारोप असणार आहे.नागरिकांनी या ग्रंथोत्सोवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.
ठाण्यामध्ये ग्रंथोत्सोवाचे आयोजन