उल्हासनगर: डोंबिवलीतील एकाचे लग्न उल्हासनगरातील मोनिका मॅरेज हॉल मध्ये असताना धक्का लागला या किरकोळ कारणावरुन एका 25 वर्षीय तरुणाचा दोन अल्पवयिन मुलांनी गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना दुपारी घडली आहे. उल्हासनगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात अल्पवयिन आरोपिच्या मुसक्या आवळल्या आहेत. डोंबिवली नांदिवली येथील रवी मंजळे याचे दुपारच्या समारास मोनिका मॅरेज हॉल मध्ये लग्न झाले.लग्नानंतर मंजुळे ह्यांचे नातेवाईक असलेले रवी सुरेश शिंदे आणि दोन अल्पवयिन | मुले यांच्यात किरकोळ वाद झाला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यावर दोघांनी रवी शिंदे याचा गळा आवळून खून केला आणि पळ काढला.रवी याला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता त्याला वैद्याकीय अधिकाऱ्यानी मृत घोषित केले. उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन तडाखे यांनी पथका सोबत मानपाड़ा डोंबिवली गाठुन दोन्ही अल्पवयिन आरोपी मुलांच्या मुसक्या आवळल्या आहे.
लग्न समारंभात नातेवाईकानेच केला नातेवाईवाकाचा घात!!