खर्चु नका देवासाठी पैसा !
शिक्षणाला पैसा तोच द्या हो !!
नको मंदिराची करावया भर !
छात्र जो हुशार त्यास द्यावा !!
नको धर्मकृत्ये पैसा खर्चुनिया
घेण्यासाठी विद्या तोच खर्चा !
शाळेहुन नाही थोर ते मंदिर !
देणगी उदार शाळेला द्या !!
भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर
शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ !!
गरिबांनी तरी फेकावा
विश्वास देवाजीची आस पूर्ण खोटी !!
नसलेले देव कोठून येणार ?
कल्याण होणार कधी सांगा !!
स्वताचा उद्धार करा प्रयत्नाने !
शक्तीने, युक्तीने सुखी व्हावे !!
- संत गाडगेबाबा