धर्मांतराने दलितांना काय दिले

हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून 'आब-ए-जमजम' आणतात. आमचे बौद्ध बंध मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे. खेडी सोडन शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखन बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात, अ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार. ब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्या रीतीने संरक्षण व्हावे. क). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदूंकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणा-या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, 'खेडापाड्यातून रहाणा-या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणा-या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते. ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशन्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघन जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही. गेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्मण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व १९४८ च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावलेजातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्तासंपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते