सातवीच्या विद्यार्थिनीवर तिघांचा अत्याचार

उल्हासनगर -चौदा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी उल्हासनगर मधील कॅम्प पाच परिसरात राहते. त्याच परिसरात राहत असलेल्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध तयार झाले. त्यानंतर त्या मुलाने पीडित मुलीवर २०१९ च्या जून महिन्यात तिच्यावर प्रेम टेकडी परिसरात वारंवार अत्याचार केला. ७ डिसेंबरला पीडित मुलगी घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन त्या मुलाला भेटली. मात्र, त्याने तिच्यासोबत पळून जाण्यास नकार दिला. त्यानंतर ती तिच्या ओळखीचे शिक्षकाच्या घरी आसरा घेण्यासाठी गेली. शिक्षकानेही तिच्यावर घरातच बळजबरीने अत्याचार केला. कल्याण रेल्वे स्थानकात तिची ओळख सोलापूरच्या एका मुलाशी झाली. त्यानेही तिच्या असहा-यतेचा फायदा घेऊन तिला पुण्याला नेले. हिललाईन पोलिसांनी तिच्या मोबाईलचे लोकेशन शिर्डी येथे दाखवत असल्याने शिर्डीला जाऊन आरोपीआणि पीडित मुलीला ताब्यात घेतले.