दारूबंदीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

उल्हासनगर : देशातील काही शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविकांनी महासभेत मांडलेला उल्हासनगरातील दारूबंदीचा प्रस्ताव सोमवारी बहुमतानी मंजूर झाल्याने, बारमालक व दारूच्या दुकानदारात खळबळ उडाली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी महासभेत दिले. राज्य शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर दारुबंदी लागू करणारी ही बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरेल. उल्हासनगरात डान्सबार, बार, हॉटेल, लॉजिंग- बोर्डिंग, हुक्का पार्लर आदीच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असून अंमली पदार्थ विक्रीचा धंदा तेजीत आहे.सोंडे, प्रमोद टाले यांच्यासह विविध पक्षाच्या नगरसेवकांनी दारूबंदीबाबत मते मांडली. अखेर दारूबंदी लाग करण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठींबा देत प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. महापालिका महासभेत प्रथमच दारूबंदीच्या प्रस्तावावर सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आल्याचे चित्र महासभेत दिसले. दारूबंदीला विरोध दिसायला नको, म्हणून काही सदस्यांनी दारूबंदीच्या प्रस्तावाला नाईलाजास्तव मंजुरी दिली, अशी कबुली काही सदस्यांनी दिली. गेल्या काही वर्षात शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली, असा ठाणे आयुक्तालयाचा अहवाल सांगतो. शहरात गांजा यासारख्या अंमली पदार्थासह गावठी दारू ची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी केला. हॉटेल, बार, महिला डान्सबार, लॉजिंग-बोर्डिंग, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर आदीमुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे सुर्वे म्हणाले. सदर ठरावाची महासभा इतिवृत्ताची वाट न पाहता, अंमलबजावणी करण्याची मागणी बहुंताश नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. . दारूबंदीचा प्रस्ताव.याप्रकाराने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी केला. याप्रकाराला आळा घालण्यासाठी व शेकडोंचे संसार उघडे होण्यापासून वाचवण्यासाठी गावात दारूबंदी लागू करण्याप्रमाणे शहरात दारूबंदी लागू करण्याचा अशासकीय प्रस्ताव सोमवारच्या महासभेत आणला होता. विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, भाजपचे गटनेता जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, मीना