अन्यथा पॅनकार्ड होऊ शकते निष्क्रिय

नवी दिल्ली : कद्राय अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणेप्रमाणे पॅन कार्ड आणि आधार कार्डाचे लिंकिंग करण्याची अंतिम मुदत ही ३१ डिसेंबरपर्यंत आहे. या महिनाअखेर असे लिंकिंग न केल्यास संबंधितांचे पॅन कार्डहेनिष्क्रिय होणार आहे. त्यामुळे हे लिंकिंग तातडीने करणे गरजेचे आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पॅन व आधारची जोडणी करून प्राप्तिकर विभागाच्या सेवा विनासायास मिळवा, असे प्राप्तिकर विभागाने या निवेदनात म्हटले आहे. याआधी पॅन व आधारची जोडणी करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, प्रत्यक्ष कर मंडळाने नंतर ती ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. ही मुदत संपण्याच्या आधी प्राप्तिकर विभागाने या मुदतीची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. त्यामळे आपले कोणत्याही कारणास्तव पॅन कार्ड हेआधार कार्डलाजोडणे शक्य झाले नसेल तर येत्या १५ दिवसांपर्यंत जोडता येणार आहे.अद्यापही ज्यांनी आधार कार्डाशी पॅन कार्ड लिंक केले नसेल, त्यांच्यासाठी हे करण्याची पद्धती देत आहोत. पॅन कार्ड आणि आधार कार्डचे लिंकिंग हे ऑनलाइन पद्धतीने केले जाऊ शकते. सर्वप्रथम https:// www.incametax india efiling.gov.in या इन्कम टॅक्सच्या इ-पोर्टलवर लॉग इन करावे. या पानाच्या डाव्या बाजला असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा या कार्डचा नंबर तसेच आधार नंबर, पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे पॅन आधार कार्डावर असलेले नाव टाकावे. आधार कार्डावर केवळ जन्माचे वर्ष असल्यास त्या पर्यायाला टीक करावी येथील सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कप्चा टाकून सबमिट करावे. यानंतर येथेच आपल्याला लिंकिंग झाल्याचा संदेश मिळेल. जर आपले पॅन आणि आधार कार्ड आधीच लिंक झालेले असेल, तर तसा संदेश आपल्याला दिसेल. मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDEAN<12 digit Aadhaar><10 digit PAN> असे टाइप करावे. हा मेसेज ५६७६७८ अथवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवावा. यासाठी एनएसडीएल अथवा यूटीआय कोणताही आकार घेणार नाहीत. मात्र मोबाइल ऑपरेटर एसएमएसचे चार्जेस आकारतील.