अंबरनाथ- प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून १९ वर्षीय नवविवाहितेला भरस्त्यात गाठून तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने धारदार चाकूने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नवविवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार | सुरू आहे. तर, पत्नीला वाचवण्यासाठी आलेल्या पतीवरही आरोपीने चाकू हल्ला केला. ही खळबळजनक घटना अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडोळगाव ओटी सेक्शन परिसरात घडली आहे. याप्रकरणी जखमी नवविवाहितेच्या जबानीवरून अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आह. विशाल खाड (१९) अस अटकेत असलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शहरातील वडोळगाव ओटी सेक्शन परिसरात आरोपी विशाल राहतो. त्याच परिसरात जखमी विवाहिता राहत असन लग्नाआधी दोघांची मैत्री होती. मात्र, त्या तरुणीचा तीनच दिवसांपूर्वी आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न लावून दिले. मात्र, आरोपी विश् तरुणीशी लग्न करायचे होते.
प्रेमात दगा दिल्याच्या संशयातून नवविवाहितेवर चाकूने वार